|
मुलगा पांच वर्षाचा
होतांच दामशेटानें त्यास तेव्हांच्या रुढीप्रमाणें शाळेत घातलें. पण या स्वारीला
विठ्ठलनामाशिवाय दुसरें तिसरें कांहीं सुचले तर पंतोजीच्या ओनामाकडे याचें
लक्ष जाणार ? पंतोजी जरा कोठें बाहेर गेले कीं हा आपल्या सवंगड्यास विठ्ठलनामाचें
स्मरण करा, विठ्ठलनाम वाचा, विठ्ठलनाम लिहा असें सांगें. विठ्ठलनामावर व
विठ्ठलाचे चरणीं या अल्पवयांत त्याची निस्सीम श्रद्धा होती. सात वर्षाचा
होऊन तो हिंडूं फिरुं लागतांच दगडाचे टाळ बनवून सवंगड्याचे मेळे जमवून तो
विठ्ठलनामाचा गजर करी व तो विठ्ठलनामांतच दंग होऊन जाई. कर कटीवर ठेवून विटेवरी
उभा असलेला पांडुरंग आपल्या बरोबर भजन करील अशी त्याची दृढ श्रद्धा. हा दगडाचा
अचेतन विठ्ठल आपल्याशीं बोलूं शकणार नाहीं हि कल्पनाहि त्याचे मनाला शिवली
नाहीं. त्याला भजनाचा विलक्षण छंद लागला होता, व भजनाचा हा सुखसोहळा श्रीपांडुरंगाने
आपल्या बरोबर अनुभवावा असें त्यास वाटून तो देवाजवळ धरणें घेऊन बसें. बालनामदेवाची
आपले चरणीं असलेली अचल निष्ठा पाहून श्रीपांडुरंगहि त्याचेबरोबर नाचण्यास
अनमान करीत नसे. नामदेव हरि हरि असें भजन करीत असतां श्रीपांडुरंग हरि हरि
न म्हणतां हरहर असें म्हणत असल्यांचे नामदेवांचे ध्यानीं येतांच देवांनींसुद्धा
हरि हरि असें म्हणावे म्हणुन नामदेव हट्ट घेऊन बसला व शेवटीं हाहि हट्ट श्रीपांडुरंगाने
पुरविला. दिवसेंदिवस नामदेवांची सांगावें आणि देवांनी ऎकावें असें होऊ लागलें.
श्रीपांडुरंग नामदेवांच्या भक्तीला इतके भाळुन गेले की, त्यांनी नामदेवांच्या
सांगीवरुन नामदेवांनीं आणलेला नैवेद्यहि खाऊन टाकला. जी जी गोष्ट आपण करतों
ती ती आपल्या देवांनी करावी असें नामदेवास वाटे. एकदां नामदेवांनी चुलीवरचें
कढत दूध नेऊन देवास पिण्यास दिलें. पण देव तें कढत असल्यामुळें पिईनात. तेव्हा
नामदेवांनीं त्रागा करुन, जीव देण्याचा निश्चय केला, व देवांनी तें तसें
कढत दुध प्राशन केलें. घरातील सर्व दुध खलास झाल्यामुळें नामदेवांस गोणाबाईनें
जाब विचारता श्रीविठ्ठलाला तें मी नेऊन पाजलें असें त्यानें सांगितले. तूं
खोटें बोलतोस असें म्हणतांच चला देवाकडे, मी कधीहि खोटे बोलत नाहिं असें
त्यांनी सांइग्तले. प्रचिती पाह्तां सत्य उघड्कीस येऊन श्रीविठ्ठल नामदेवाशीं
बोलतात, त्याचा नैवद्य भक्षण करतात असा चोहोंकडे बोमाटा झाला. प्रत्यक्ष
देव नामदेवांशी सर्व प्रकारचे व्यवहार कर्तात अशी नामदेवांची कीर्ति ऎकुन
गोविंदशेट सदावतें यांनी आपली राजसबाई नांवाची मुलगी नामदेवास देऊं केली,
व दामशेटानें नामदेवाचें लग्न त्याच्या आठव्या वर्षी मोठ्या थाटाने करुन
दिलें.
Previous
Page 0 1
2 3
4 5 6 7 Next Page
|
|