|
श्री.संतशिरोमणी नामदेव
महाराज. (इ.स.१२७० ते इ.स.१३५०) नरसीबामणी (कऱ्हाड).

इ. स. ११९३ साली पृथ्वीराजाचा चव्हाण वध होऊन उत्तर हिंदुस्तानांत मुसलमानांचा
अंमल कायम झाला व हिंदुधर्मीयांस वाईट दिवस प्राप्त झाले. परंतु इ. स. १२९४
पर्यंत त्यांना दक्षिण हिंदुस्थानांत प्रवेशा करीतां आला नाहीं. दक्षिणेस
देवगिरी येथें यादवकुलोत्पन्न रामदोवराव राज्य करीत असतां इ. स. १२९४ साली.
अल्लाउद्दिन खिलजीनें देवगिरीवर स्वारी करुन रामदेवरावांचा परभव केला व अल्लाउद्दिनाचा
तिसरा मुलगा मुबारिक यानें इ. स. १३१८ त. दक्षिण प्रांतीं आपला पूर्ण अम्मल
बसविला. दक्षिण हिंदुस्थानकडे मुसलमानांचा डोळा गेला आहे अशा सुमारास हिंदुधर्मावर
पुढें येणाऱ्या संकटास तोंड देण्यास. हिंदुधर्मीयांस समर्थ करण्याकरीतां
इ. स. १२७१ सालीं श्रीविष्णुरुपानें श्रीज्ञानदेव प्रगट झाले. त्याचे आधीं
इ. स. १२६८ सालीं श्रीशंकराचे अंश श्रीनिवृत्तीनाथ जन्मास आले. निवृत्ति,
नामदेव, सोपान व मुक्ताबाई अशी ही चोकडी व नामदेवमहाराज असे एक दोन वर्षाच्या
अंतरानें श्रीविठ्ठलाच्या झेंड्याखलीं भागवधर्माचा प्रसार करुन हिंदुधर्माचें
संरक्षण कर्ण्याकरितां महाराष्ट्राच्या पुण्यभूमींत संचार करुं लागले. आबालवृद्ध
-स्त्रीपुरुष,-'ज्ञानी'-अज्ञानी, स्पृश्य-अस्पृश्य, स्वधर्मी, विधर्मी, यांना
आपल्या पंखाखाली घेऊन, सर्वांना हिंदुधर्माच्या कक्षेंत ठेवणाऱ्या व भक्ति
ज्ञान वैरग्य, या त्रयीवर अधिष्ठित असलेल्या भागवतधर्माच्या तत्वांचा या
पांच अवतारी पुरुषांमध्ये महान् विठ्ठालभक्त नामदेव महाराज यांचा समावेश
होतो. भवसागर तरुन जाण्याकरितां अत्यंत सोपें साधन व आबालवृद्धांनाहि अनुसरतां
येण्यासार्खें श्रीविठ्ठल नामरुपी साधन श्रीनामदेवमहाराजांनी सर्वांना दाखवून
दिलें. किंबहुना विठ्ठलनामाचें मह्त्त्व पट्वून देण्याकरितांच नामदेवांचा
अवतार होता असें म्हणतां येईल. एक माझ्या पांडुरंगाला चित्तांत नेहमी आठवा
म्हणजे तुमचा उद्धार होईल, हें श्रीनामदेवमहारजांनीं स्वोदाहर्णानें अखिल
जनांस पट्वून दिंले. सबगोलंकारी मुसलमानी धर्माच्या मोहक स्वरुपास फसून हिंदुधर्मीय
विचलित होण्याचा संभव आहे. हें जाणूनच या नामरुपी धर्माची ढाल हिंदुधर्मीयांचे
संरक्षण करण्याकरितां पुढें करुन, हिंदुधर्मास संघटित करुन नामदेवांनी अवघ्या
२६ वर्षात आपलें अवतारकार्य संपविलें.
0
1 2
3 4 5 6 7 Next Page
|
|